बाजार विभाग

लेखा विभाग

दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी टॅली सॉफ्टवेअर मध्ये संगणीकृत करुन आर्थिक पत्रके तयार करणे

तसेच बँक संबंधित सर्व व्यवहाराचे कामकाज करणे. एका आर्थिक वर्षात तीन अर्थसंकल्प पणन मंडळाकडे सादर करणे. शासनाला देय असलेले सर्व कर तसेच विविध देय भरणा करणे. लेखा विभागा संबंधित सर्व काम-काज करणे.

सांख्यकि विभाग

दैनंदिन बाजार भाव काढुन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे. वार्षिक बाजारभाव भरणे.

आस्थापना विभाग

बाजार समितीचे आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, रोजंदारी कर्मचार यांचे आस्थापना संबंधित सर्व आदेश काढणे, रजा खतवणी नोंदविने, त्यांचे कामकाजाचे नियोजन करणे, त्या संबंधीत सुचना पत्र देणे इत्यादी.

अनुज्ञाप्ती विभाग

बाजार समिती मध्ये खालील प्रमाणे परवानाधारक आहेत.

अनु. क्र. अनुज्ञाप्तीचा प्रकार एकूण अनुज्ञाप्ती
1 व्यापारी
2 अडते
3 सरकारी स्वस्त धान्य दुकान
4 मापारी

डिमांड विभाग

परवानाधारक अडते व खरेदीदार मार्केट यार्डवर खरेदी – विक्रीच्या नोंदणी धान्य डिमांड विभागात होते. व मार्केट फी व सुपरव्हीजन फी ची आकारणी या विभागा अंतर्गत होते.

अडत / खरेदी तपासणी विभाग

दैनंदिन अडत / खरेदी बिलांची माहवार तपासणी केली जाते.

शेतमाल तारण विभाग

शेतकऱ्यांना त्यांचे शेतमाल तारणावर तारण कर्ज देण्यात येते. हंगामाच्या काळात बाजारामध्ये शेतमालाची आवक वाढलेली असते. बरेचवेळा आवक जास्त असल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात शेतकऱ्यांना शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये व त्यांची पैशाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे निर्देशाने बाजार समिती स्वनिधीतुन शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येते. या विभागात शेतकऱ्यांने शेतमालावर आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करुन तारण कर्ज देण्यात येते.

रोखपाल

बाजार समिती मधील मार्केट फी, सुपरव्हीजन फी, शेतमाल तारण, गाळे भाडे व इतर मिसलेनियस भरणा स्विकारण्यात येतो. रोख विभागातील रोख, धनादेश (चेक), नेट बँकींग द्वारे भरणा झालेल्या रक्कमांच्या पावत्या बनवुन सदर भरणा झालेल्या रकमांच्या पावत्या बनवुन सदर भरणा बाजार समितीचे बॅक खात्या मध्ये दैनंदिन जमा केल्या जाते. या सर्व व्यवाहाराची नोंद कॅश बुकला घेतल्या जाते.

धान्य विभाग

धान्य विभागात शेतकऱ्या मार्फत येणाऱ्या शेतमालाचे विक्री ही खुल्या लिलाव पध्दतीने करण्यात येते. सदर लिलाव हा परवानाधारक खरेदीदार, अडते व शेतकरी यांचा समोर होते. परवाणाधारक मापाऱ्यांकडुन शेतमालाचे अचुन मोजपाम करण्यात येते. बाजार समितीने नेमलेल्या कर्मचाऱ्यां मार्फत सदर लिलावाची सौदा पट्टी देण्यात येते. शेतकऱ्यांना त्याचे शेतमालाची रक्कम अडत्या कडुन मिळते.

गाळे/गोदाम भाडे विभाग

बाजार समितीमध्ये 20 गाळे व पाच गोदाम असुन व्यापाऱ्यांना मासिक भाडयाने दिलेलेआहे.

आवक-जावक विभाग

दैनंदिन कार्यालयीन पत्रव्यवहाराचे आवक व जावक नोंद घेण्यात येते.